मुंबईत मुलुंड येथे समविचारी लोकांनी एकत्र येऊन "जेन नेक्स्ट" नावाचा एक समूह केला आहे. या समूहाची टॅग लाईन म्हणजे "Gen Next - Not By Age But By Thoughts" अशी आहे. मी या समूहाचा सदस्य आहे. आणि हा समुह फक्त WhatsApp समूह नसून काही लहान मोठे उपक्रमही राबवतो. गेल्यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेनंतर याची कल्पना रुजली आणि महाराष्ट्र दिनी अधिकृतरित्या हा समूह स्थापन झाला असे म्हणता येईल.
या मित्रवर्गाचे खूप सारे उपक्रम आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारेही आणि काही मौजमजेसाठीचेही. या उपक्रमांबद्दल सविस्तर परत कधीतरी.
यातील आणखी एक उपक्रम म्हणजे "पुस्तक आदानप्रदान" किंवा "Book Exchange".आजच्या डिजिटल युगात, E-Book Readerच्या जमान्यात हातात पुस्तक घेऊन वाचणे हा प्रकार थोडा मागे पडला आहे हे सत्य असले तरी या readerला खऱ्या पुस्तकाची सर कधीच येणार नाही. हाच धागा पकडून जेन नेक्सटने हा Book Exchange उपक्रम चालू केला. हा उपक्रम आता पर्यंत तीन वेळा झाला. शुक्रवार ०३/०२/२०१७ रोजी मी याला हजेरी लावू शकलो. ही त्याची काही शब्दचित्रे आणि क्षणचित्रे........
उपक्रमात सदस्यांनी आणलेली पुस्तके |
हा उपक्रम म्हणजे वाचनालय नाही. ही पुस्तके कोणा एकाच्या मालकीची नसून सर्व सदस्य आपापली पुस्तके घेऊन येतात आणि ज्याला जे पुस्तक हवे ते घेऊन जातात. पुस्तकाच्या मूळ मालकाने स्वतः:चे नाव त्यावर लिहिलेले असते आणि एका नोंदवहीत ते पुस्तक कोणी आणि कधी वाचायला नेले त्याचे विवरण लिहिलेले असते.
उपक्रमात भाग घेणारी बच्चे कंपनी |
मी चार पुस्तके नेली होती, दोन मराठी दोन इंग्रजी. चारही पुस्तके मित्र सदस्यांनी वाचायला नेली. तर मी एक पुस्तक आणले, श्री. विलास मनोहर यांनी लिहिलेले "नेगल"! जाणकारांना कळले असेलच हे पुस्तक कोणाबद्दल आहे!! अर्धे अधिक वाचून झाले आहे हे पुस्तक माझे.
मी सध्या हे वाचत आहे |
लेखन चांगले व्हावे म्हणून वाचन हवे या जाणिवेतून मी हा वाचनाचा उद्योग सुरू केला आहे. प्रकाशचित्रणाव्यतिरिक्त हा अजून एक मार्ग, कचेरीतील कामाच्या ताण तणावातून बाहेर येण्याचा! हा ही उद्योग असाच चालू राहावा हीच इच्छा व्यक्त करून आतापुरता निरोप घेतो.
दिवस सत्तावन्नावा, पान सत्तावन्नावे!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteवाह! माहितीपूर्ण व सहजसुंदर सादरीकरण.
ReplyDelete